सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

तुम्ही Google वर शोधता तेव्हा, तुमच्या स्थानाविषयी माहिती जाणून घेणे आणि ती व्यवस्थापित करणे

तुम्ही Maps, Search किंवा Google Assistant यांसह Google वापरता, तेव्हा तुमचे वर्तमान स्थान तुम्हाला अधिक उपयुक्त परिणाम देण्यासाठी वापरले जाते. उदाहरणार्थ, तुम्ही कॉफी शॉप शोधल्यास, तुम्ही जवळपासची कॉफी शॉप शोधत असल्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या शोधामध्ये स्थान समाविष्ट केलेले नसले, तरीही तुमचे स्थान तुमच्या जवळपासचे परिणाम दाखवण्यात मदत करते.

तुम्ही कुठे आहात याचा अंदाज लावण्यासाठी विविध स्रोतांकडून येणारी तुमच्या स्थानाची माहिती एकत्रितपणे वापरली जाते. तुम्हाला हवे असलेले शोध परिणाम मिळवण्यासाठी Google सेवा वापरत असताना तुम्ही तुमची स्थान सेटिंग्ज अपडेट करू शकता आणि तुमच्यासाठी योग्य असलेल्या पद्धतीने गोपनीयता नियंत्रित करू शकता.

तुम्हाला तुमची सेटिंग्ज बदलण्यापूर्वी स्थान कसे काम करते याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास, खाली तुम्ही शोधता तेव्हा Google स्थान कसे निर्धारित करते याविषयी माहिती मिळेल.

उत्तम स्थानिक परिणाम मिळवण्यासाठी तुमचे स्थान अपडेट करा

तुम्ही एखादी गोष्ट शोधत असल्यास जी जवळपास आहे आणि ती स्थानिक शोध परिणामांमध्ये सापडत नसल्यास ही निराकरणे वापरून पाहा:

  • चेल्सीमधील कॉफी शॉप याप्रमाणे तुमच्या शोधामध्ये तुमचे सध्याचे स्थान जोडा.
  • तुम्ही शोधता तेव्हा तुमचे डिव्हाइस Google ला स्थान पाठवते हे तपासा. तुमच्या डिव्हाइसची स्थान सेटिंग्ज व्यवस्थापित करण्यासाठी खालील पायऱ्या फॉलो करा.

तुम्ही हे सेट करता, तेव्हा तुमच्या घरापासून किंवा ऑफिसपासून तुम्हाला आणखी चांगले परिणाम देण्यासाठी Google ला मदत करू शकता:

तुमच्या डिव्हाइसची स्थान सेटिंग्ज व्यवस्थापित करा

तुमचे डिव्हाइस स्थान सेटिंग सुरू असल्यास आणि तुमच्या अ‍ॅप व ब्राउझर परवानग्या त्याला अनुमती देत असल्यास, फोन आणि टॅबलेट हे अ‍ॅप्स व वेबसाइटला स्थानाची माहिती पाठवू शकतात. तुमच्या डिव्हाइसवरून google.com च्या समावेशासह इतर कोणत्याही अ‍ॅप किंवा वेबसाइटला स्थान पाठवले जावे की नाही ते तुम्ही तुमच्या स्थान परवानग्या बदलून नियंत्रित करू शकता.

महत्त्वाचे: तुम्ही तुमच्या अ‍ॅप किंवा ब्राउझर परवानग्या व्यवस्थापित करण्यापूर्वी, तुमच्या फोन किंवा टॅबलेटचे डिव्हाइस स्थान सुरू केले आहे का, हे तपासा. तुमच्या Android डिव्हाइसची स्थान सेटिंग्ज व्यवस्थापित करणे हे कसे करावे ते जाणून घ्या.

स्थान परवानग्या व्यवस्थापित करा

google.com यासारख्या वेबसाइटसाठी

तुम्ही Chrome यासारख्या वेब ब्राउझरमधील वेबसाइटला भेट देता तेव्हा तुम्ही ब्राउझरसाठी आणि google.com सारख्या तुमच्या स्थानाकरिता विनंती करणार्‍या वेबसाइटसाठी स्वतंत्रपणे स्थान परवानग्या सुरू किंवा बंद करू शकता.

तुम्हाला google.com यासारख्या वेबसाइटला तुमच्या डिव्हाइस स्थानाचा अ‍ॅक्सेस द्यायचा असल्यास, तुमच्या ब्राउझर आणि वेबसाइट या दोन्हींसाठी स्थान परवानगी सुरू करा.

तुमच्या ब्राउझरसाठी स्थान परवानगी सुरू किंवा बंद करा

तुमचा ब्राउझर स्थान वापरू शकतो की नाही ते तुम्ही नियंत्रित करू शकता.

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, सेटिंग्ज अ‍ॅप Settings उघडा.
  2. स्थान आणि त्यानंतर अ‍ॅप परवानगी वर टॅप करा.
  3. Chrome सारख्या तुमच्या ब्राउझर अ‍ॅपवर टॅप करा.
  4. ब्राउझर अ‍ॅपसाठी स्थान अ‍ॅक्सेस निवडा: अनुमती द्या किंवा नकार द्या.

महत्त्वाचे: यांपैकी काही पायऱ्या फक्त Android 10 आणि त्यावरील आवृत्त्यांवर काम करतात. Android च्या याआधीच्या आवृत्त्यांच्या स्थानासह तुमच्या अ‍ॅप परवानग्यांना कसे नियंत्रित करावे ते जाणून घ्या.

तुमच्या वेबसाइटसाठी स्थान परवानगी सुरू किंवा बंद करा

तुमचा ब्राउझर स्थान वापरू शकत असल्यास, तुमचा ब्राउझर google.com यासारख्या विशिष्ट वेबसाइटला स्थान पाठवू शकतो की नाही ते तुम्ही नियंत्रित करू शकता.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, तुमचा ब्राउझर उघडा आणि google.com वर जा.
  2. अ‍ॅड्रेस बारच्या डावीकडे, लॉक करा Lock आणि त्यानंतर परवानग्या वर टॅप करा.
  3. google.com साठी स्थान सुरू किंवा बंद करा.

Chrome मध्ये साइट परवानग्या बदलणे याबद्दल अधिक जाणून घ्या.

महत्त्वाचे: काही वेळा तुमच्या ब्राउझरला तुमच्या डिव्हाइसचे सध्याचे स्थान मिळवण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. तुम्हाला त्वरित शोध परिणाम देण्यासाठी, google.com तुम्ही मागील वेळेस Google वापरले तेव्हाच्या तुमच्या डिव्हाइसचे स्थान वापरू शकते. हे स्थान सहा तासांनंतर एक्स्पायर होणार्‍या कुकी सेटमध्ये स्‍टोअर केलेले असते. कुकी व्यवस्थापित करणे याबद्दल अधिक जाणून घ्या.

Google ॲप यासारख्या ॲपसाठी

​​तुम्ही Google अ‍ॅप किंवा Google Maps यांसारखे एखादे अ‍ॅप वापरून शोधत असल्यास, अ‍ॅपला स्थान उपलब्ध असावे की नाही ते तुम्ही तुमच्या फोन किंवा टॅबलेटच्या स्थान परवानग्या वापरून नियंत्रित करू शकता.

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, सेटिंग्ज अ‍ॅप Settings उघडा.
  2. स्थान आणि त्यानंतर अ‍ॅप परवानगी वर टॅप करा.
  3. तुम्ही शोधण्यासाठी वापरत असलेल्या Google ॲप Google Search किंवा Google Maps Maps यांसारख्या ॲपवर टॅप करा.
  4. या अ‍ॅपसाठी स्थान अ‍ॅक्सेस निवडा: अनुमती द्या किंवा नकार द्या.

महत्त्वाचे: यांपैकी काही पायऱ्या फक्त Android 10 आणि त्यावरील आवृत्त्यांवर काम करतात. Android च्या याआधीच्या आवृत्त्यांच्या स्थानासह तुमच्या अ‍ॅप परवानग्यांना कसे नियंत्रित करावे ते जाणून घ्या.

तुम्ही शोधता तेव्हा Google तुमचे स्थान कसे ठरवते

तुम्ही Maps, Search किंवा Google Assistant यांसह Google वापरता, तेव्हा तुमच्या सध्याच्या स्थानाचा अंदाज अनेक स्रोतांच्या उपलब्धतेनुसार लावला जातो.

महत्त्वाचे: तुमच्या डिव्हाइसच्या परवानग्या, तुमची खाते प्राधान्ये किंवा इतर सेटिंग्ज वापरून यापैकी बर्‍याच ठिकाणांचे स्रोत नियंत्रित केले जाऊ शकतात. तुमच्या निवडींचा तुमची गोपनीयता आणि स्थान यांवर कसा प्रभाव पडतो याविषयी खाली अधिक जाणून घ्या.

तुम्ही शोधता तेव्हा स्थान निश्चित करण्याचे स्रोत

तुम्ही Google वापरता, तेव्हा परिणाम पेजच्या तळाशी तुमच्या स्थानाचा अंदाज कसा लावला गेला ते तुम्ही पाहू शकता.

तुमच्या डिव्हाइसचे स्थान

फोन किंवा कॉंप्युटरसारखी बरीच डिव्हाइस त्यांचे अचूक स्थान मिळवू शकतात. या प्रकारचे अचूक स्थान दिशानिर्देश देण्यासाठी किंवा तुमच्या जवळपासचे शोध परिणाम उपयुक्त करण्यात मदत करणारी Google Maps सारख्या अ‍ॅप्ससाठी उपयुक्त आहे. उदाहरणार्थ, कॉफी शॉप, बस थांबा किंवा ATM यासारखे काही शोध तुम्ही कुठे आहात याच्या अचूकतेवर अवलंबून असतात, त्यामुळे सहसा स्थान परवानग्या सुरू केल्यामुळे आणखी उपयुक्त परिणाम देतील.

वरील पायऱ्या फॉलो करून, तुम्ही शोधताना स्थान उपलब्ध असल्यास ते निवडण्यासाठी तुम्ही तुमची डिव्हाइस आधारित स्थान सेटिंग्ज व्यवस्थापित करू शकता. तुमच्या डिव्हाइसनुसार, तुम्ही सहसा स्वतंत्र अ‍ॅप्स आणि वेबसाइटसाठी व तुमच्या डिव्हाइसकरिता स्थान सुरू किंवा बंद करू शकता.

तुम्ही Nest Audio किंवा Nest Hub यांसारखे स्मार्ट होम डिव्हाइस वापरत असल्यास, तुम्ही Google Home अ‍ॅपमध्ये डिव्हाइसचे स्थान सेट करणे हे करू शकता.

तुमचे शोध परिणाम मिळवण्यासाठी तुमच्या डिव्हाइसचे स्थान वापरले गेले असल्यास, शोध परिणाम पेजच्या तळाशी असलेली स्थानाची माहिती ही तुमच्या डिव्हाइसवर आधारित असे दाखवेल.

महत्त्वाचे: काही वेळा तुमच्या ब्राउझरला तुमच्या डिव्हाइसचे सध्याचे स्थान मिळवण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. तुम्हाला त्वरित शोध परिणाम देण्यासाठी, google.com तुम्ही मागील वेळेस Google वापरले तेव्हाच्या तुमच्या डिव्हाइसचे स्थान वापरू शकते. हे स्थान सहा तासांनंतर एक्स्पायर होणार्‍या कुकी सेटमध्ये स्‍टोअर केलेले असते. कुकी व्यवस्थापित करणे याबद्दल अधिक जाणून घ्या.

तुमच्या Google खाते मधील घराचा किंवा ऑफिसचा पत्ता

तुम्ही तुमच्या घराचे किंवा ऑफिसचे पत्ते सेट केल्यास, तुम्ही यापैकी एका ठिकाणी असण्याची शक्यता असते, तेव्हा तुमच्या स्थानाचा अंदाज घेण्यासाठी ते वापरले जाऊ शकतात.

तुम्ही तुमच्या Google खात्यामध्ये घरआणि ऑफिस यांचे पत्ते संपादित करू शकता.

तुमचे शोध परिणाम मिळवण्यासाठी तुमच्या घराचे किंवा ऑफिसचे स्थान वापरले गेले असल्यास, शोध परिणाम पेजच्या तळाशी असलेली स्थानाची माहिती ही तुमच्या (घर) किंवा (ऑफिस) या ठिकाणांवर आधारित असे दाखवेल.

Google साइट आणि अ‍ॅप्सवरील तुमची मागील अ‍ॅक्टिव्हिटी

तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केले असल्यास आणि वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू केली असल्यास, Google साइट, अ‍ॅप्स आणि सेवांवरील तुमची अ‍ॅक्टिव्हिटी तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केली जाऊ शकते. तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीमधील काही गोष्टींमध्ये तुम्ही त्यावेळी होता त्या सर्वसाधारण भागाचा समावेश असू शकतो. तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीत अचूक स्थान असल्यास, तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये अचूक स्थान स्टोअर केले जाऊ शकते.

काही प्रकरणांमध्ये, तुम्ही यापूर्वी शोधलेली क्षेत्र तुमच्या शोधाशी संबंधित स्थानाचा अंदाज घेण्यासाठी वापरले जाऊ शकते. उदाहरणार्थ, तुम्ही चेल्सीमधील कॉफी शॉप आणि नंतर नेल सलून शोधत असल्यास, Google चेल्सीमध्ये नेल सलून दाखवू शकते.

तुम्ही myactivity.google.com वर तुमची वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी पाहू आणि नियंत्रित करू शकता. तुमच्या खात्यावरील अ‍ॅक्टिव्हिटी कशी पाहायची आणि कशी नियंत्रित करावी ते जाणून घ्या.

तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केलेले नसल्यास, आणखी उपयुक्त परिणाम आणि शिफारशी पुरवण्यात मदत करण्यासाठी, तुम्ही वापरत असलेल्या डिव्हाइसवरील मागील शोधांची काही स्थानाशी संबंधित माहिती Google स्टोअर करू शकते. तुम्ही Search कस्टमायझेशन बंद केल्यास, Google तुमच्या स्थानाचा अंदाज घेण्यासाठी मागील शोध वापरणार नाही. खाजगीरीत्या कसे शोधावे आणि ब्राउझ करावे याविषयी अधिक जाणून घ्या.

तुमची मागील अ‍ॅक्टिव्हिटी तुमचे शोध परिणाम मिळवण्यात मदत करण्यासाठी वापरली असल्यास, शोध परिणाम पेजच्या तळाशी असलेली स्थानाची माहिती "तुमच्या मागील अ‍ॅक्टिव्हिटीवर आधारित" असे दाखवेल.

तुमच्या इंटरनेट कनेक्शनचा आयपी अ‍ॅड्रेस

आयपी अ‍ॅड्रेसला इंटरनेट अ‍ॅड्रेसदेखील म्हटले जाते त्याला तुमच्या इंटरनेट सेवा पुरवठादार याने तुमच्या डिव्हाइससाठी असाइन केला आहे. इंटरनेट वापरण्यासाठी याची आवश्यकता आहे. आयपी अ‍ॅड्रेस तुम्ही वापरत असलेले तुमचे डिव्हाइस आणि वेबसाइट आणि सेवा यांच्यामध्ये कनेक्शन तयार करण्यासाठी वापरले जातात.

आयपी अ‍ॅड्रेस साधारणतः भौगोलिक क्षेत्रांवर आधारित असतात. google.com च्या समावेशासह तुम्ही वापरत असलेली कोणतीही वेबसाइट यांना तुमच्या सर्वसाधारण भागाविषयी काही माहिती मिळू शकते असा याचा अर्थ आहे.

तुमच्या शोधासाठी, तुमचा आयपी अ‍ॅड्रेस तुमच्या सध्याच्या सर्वसाधारण भागाचा अंदाज घेण्याकरिता वापरला गेला असल्यास, शोध परिणाम पेजच्या तळाशी असलेली स्थानाची माहिती तुमच्या इंटरनेट अ‍ॅड्रेसवर आधारित असे दाखवेल.

महत्त्वाचे: इंटरनेट आयपी अ‍ॅड्रेसशिवाय काम करत नाही. तुम्ही Google सारख्या साइट, अ‍ॅप्स किंवा सेवा वापरता तेव्हा त्या सहसा तुमच्या स्थानाबद्दलची काही माहिती शोधू शकतात.

स्थान नियंत्रणे आणि तुमची गोपनीयता

तुम्ही Google वर शोध घेता तेव्हा तुम्ही शोधत असलेल्या सर्वसाधारण भाग याचा Google नेहमीच अंदाज लावेल. तुम्ही आहात त्या सर्वसाधारण भाग याचा अंदाज लावण्याचा अर्थ असा होतो, की Google तुम्हाला उपयुक्त परिणाम पुरवू शकते आणि नवीन शहरामधून साइन इन करणे यासारखी नेहमीपेक्षा वेगळी अ‍ॅक्टिव्हिटी डिटेक्ट केली गेल्यास, तुमचे खाते सुरक्षित ठेवू शकते.

सर्वसाधारण भाग हा ३ चौरस किमी पेक्षा मोठा असतो आणि त्यामध्ये किमान १००० वापरकर्ते असतात, जेणेकरून तुमच्या शोधामधील सर्वसाधारण भाग यामध्ये तुम्हाला ओळखले जाणार नाही आणि तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यात मदत करेल. शहरांच्या बाहेर सर्वसाधारण भाग ३ चौरस किमी पेक्षा जास्त मोठा असतो असा याचा अर्थ आहे. अंदाजे सर्वसाधारण भाग या लेखामध्ये वर्णन केलेल्या स्थान स्रोतांमधून येते.

तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरील google.com किंवा Google अ‍ॅप्स यांना स्थान परवानग्या मंजूर केल्यास, तुम्ही शोधता तेव्हा तुम्हाला सर्वोत्तम शोध परिणाम दाखवण्यासाठी तुमचे अचूक स्थान Google कडून वापरले जाईल. अचूक स्थान म्हणजे तुम्ही नेमके कुठे आहात यासारखी माहिती, जसे की विशिष्ट पत्ता.

तुम्ही तुमचा घराचा किंवा ऑफिसचा पत्ता सेट केल्यास, Google तुम्ही घरी किंवा ऑफिसमध्ये असल्याचा अंदाज लावेल आणि तुमच्या शोधासाठी नेमका पत्ता वापरला जाईल.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17541993390116304930
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false